कॉलेज फेस्टिवलच्या तयारीची लगबग सुरू असतानाच जवळ जवळ सा-या कॉलेजेसचं लक्ष आयएनटीच्या एकांकिका स्पर्धेकडे लागलेलं असतं. ही एकांकिका स्पर्धा, त्याचा निकाल आणि निकालानंतर टिपिकल नाटकवाल्यांचा स्टाईलमध्ये होणारा निषेध, परीक्षक आणि संयोजकांशी रंगणारा वादविवाद असा पुरेपूर मसाला या स्पर्धेच्या निमित्ताने अनुभवायला मिळतो. मागच्या वर्षी ‘गाडा’ करून झालेला राडा तर सर्वश्रुत आहेच.
पण या वेळी ही स्पर्धा काहीशा वेगळय़ा स्वरूपात होणार आहे. ७ सप्टेंबरपासून सुरू होणारी ही स्पर्धा नेहमीप्रमाणे पात्रता,उपांत्य व अंतिम अशा तीन फे-यांची न ठेवता दोन फे-यांची करण्यात आलेली आहे. अर्थात, प्राथमिक फेरी ही नेहमीप्रमाणे तालिम स्वरूपात असेल आणि या फेरीमधून अंतिम फेरीसाठी १५ एकांकिका निवडण्यात येतील आणि ही अंतिम फेरी तीन दिवस चालेल. त्यापैकी प्राथमिक फेरी ७ ते १२ सप्टेंबर आणि अंतिम फेरी १६ ते १८ सप्टेंबर या कालावधीत दुपारी दीड ते साडेआठ या वेळेत होईल.
यंदा आयोजकांनी स्पर्धेमध्ये केलेला आणखी एक स्वागतार्ह बदल म्हणजे प्राथमिक फेरीतून बाद झालेल्या एकांकिकांमधूनसुद्धा तीन उत्कृष्ट एकांकिका आणि अभियनाची पारितोषिकं देण्यात येतील.
एचएमएम, पुन्हा एकदा रंगदेवता आणि नाटय़रसिकांना विनम्र अभिवादन करत आयएनटीची एकांकिका स्पर्धा नक्कीच रंगणार.. सो बी रेडी पुन्हा एकदा आयएनटीच्या जल्लोषात सामील होण्यासाठी आयएनटी.. जस्ट कमिंग सून...

No comments:
Post a Comment