स्वराज्य हा माझा जन्म सिद्ध हक्क आहे आणि तो मी माल्वाणारच अशी सिंहगर्जना करणारे लोकमान्य टिळक हे भारताचे महान पुढारी होते भारताच्या ह्या नरसिंहाने स्वन्त्र्याच्या चळवळीत अमूल्य योगदान दिले , भारतीयांना स्वन्तात्र्याच्या तळमळीने जागे करण्यात त्यांचा फार मोठा हातभार होता ,अशा ह्या महान नररत्नाचा जन्म २३ जुलै १८५६ रोजी रत्नागिरी जिल्हातील चिखल गाव येथे झाला लहानपणा पासून ते हुशार आणि करारी होते अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्यांचा स्वभाव होता . लहानपणी १८५६ सालच्या स्वातंत्र्याच्या संग्रामाच्या झाशीची राणी , तात्या टोपे ह्याच्या पराक्रमाच्या गोष्टी आजोबांकडून ऐकताना त्यांच्या बालमनावर देशभक्तीचे बीज रोवले गेले , या विरांप्रमाणे आपणही आपल्या भरतभूमिला पर्दास्याच्या शृंखलेतून मुक्त करण्यासाठी प्रयत्न करावे असा त्यांनी निर्धार त्याच वेळी निर्धार केला .
BA LLB झाल्यानंतर ब्रिटीश शासनात टिळकांना उत्तम वेतनाची नोकरी मिळाली असती , परंतु त्यांनी तसे न करता आपले सारे जीवन भारत मातेच्या चरणी अर्पण करण्याचा निर्णय घेतला.इंग्रजांचे अंध अनुकरण करणार्या भारतीयांबद्दल टिळकांना अत्यंत चीड होती. ते म्हणत, "आपले काही तथाकथित शिक्षित देशबांधव साहेबांची पिण्यात बरोबरी करू शकतात,पण साहेबांची भारताच्या राज्यकारभारातील जागा मिळविण्याची महत्त्वाकांक्षा ते बाळगू शकतात का?"टिळकांनी आगरकर, चिपळुणकर आणि इतर सहकार्यांच्या मदतीने १८८१ साली केसरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली. १८८१ ते १९२० या चाळीस वर्षांच्या काळात टिळकांनी ५१३ अग्रलेख लिहिले. ' सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय ', ' उजाडले पण सूर्य कुठे आहे ,' 'टिळक सुटले पुढे काय ', ' प्रिन्सिपॉल , शिशुपाल की पशुपाल ', ' टोणग्याचे आचळ ', 'हे आमचे गुरुच् नव्हेत्', ' बादशहा ब्राह्माण झाले ' हे त्यांचे काही प्रसिद्ध अग्रलेख आहेत.त्यांच्या एका लेख बद्दल सरकार ने त्यांना ६ वर्ष सशक्त कारावासाची शिक्षा ठोठावली परंतु त्या काळात हि टिळकांनी गीतारहस्य सारखा ग्रंथ लिहिला . लोकांमध्ये एकजुटीची भावना निर्माण व्हावी म्हणून टिळकांनी गणेशोत्सव आणि शिवजयंती ह्या सारखे सार्वजनिक उत्सव सुरु केले.. ज्यांनी आपल्या पोलादी इच्छा शक्तीचा उपयोग देशाच्या स्वतंत्र साठी केला ज्यांनी आपले सारे जीवन भारत मातेच्या चरणी अर्पण केले अशा तिच्या सुपुत्राचा १ ऑगस्ट १९२० रोजी जीवनदीप मालवला .. मुंबईच्या सरदारगृहात टिळकांचा मृत्यू झाला. त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी चौपाटीपर्यंत निघालेली अंत्ययात्रा मुंबईच्या इतिहासातील सर्वात मोठी समजली जाते.
उण्या पुरा ६२ वर्षाच्या कालावधीत बाल गंगाधर टिळक ह्या नावावर जे जे काही जमा आहे ते पाहून खरच थक्क वायला होते , राजाश्रय सहज सोडणाऱ्या आणि लोकाश्रयावर जगणे पसंत करणाऱ्या ह्या थोर पुरुषास त्याच्या पुण्यतिथी च्या निमित्ताने माझे कोटी कोटी प्रणाम ..जय हिंद , जय महाराष्ट्र .

No comments:
Post a Comment