एकीकडे रॅगिंगच्या विरोधात आवाज उठवणारी महाविद्यालयातील मॅनेजमेंट या ‘फ्रेशर्स पार्टी’चं नेहमीच स्वागत करत आल्या आहेत. नुकत्याच झालेल्या ‘फ्रेंडशिप डे’च्या निमित्ताने एका प्रख्यात महाविद्यालयाच्या सीनिअर विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या सो कॉल्ड फ्रेशर्स पार्टीमधून मद्यधुंद अवस्थेतील 500 हून अधिक विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यामुळे फ्रेशर्स पार्टीना पाठिंबा देणारी सारीच महाविद्यालयं या कन्सेप्टबाबत पुनर्विचार करण्यास प्रवृत्त झाली.
चार मित्र जमले आणि धमाल सुरू झाली की त्याबरोबर सुरू होते ती पार्टी. मग ती पार ‘टी’ची म्हणजेच कट्टय़ावरच्या चहाची असो किंवा मग नाक्यावरच्या वडापावची.. आता मात्र पार्टीची व्याख्या बदलत चालली आहे.. कारण आता पार्टी म्हटलं की समोर उभी राहते ती केवळ ओली पार्टी. ‘या अशा पावसाळी, भिजलेल्या कातरवेळी एक स्मॉल पेग होती.., सिगारेट पेटलेली’ याशिवाय कुठलीही पार्टी ही आम्हाला पार्टीच वाटत नाही. एकीकडे रॅगिंगच्या विरोधात आवाज उठवणारी महाविद्यालयातील मॅनेजमेंट या ‘फ्रेशर्स पार्टी’चं नेहमीच स्वागत करत आल्या आहेत. नुकत्याच झालेल्या ‘फ्रेंडशिप डे’च्या निमित्ताने एका प्रख्यात महाविद्यालयाच्या सीनिअर विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या सो कॉल्ड फ्रेशर्स पार्टीमधून मद्यधुंद अवस्थेतील 500 हून अधिक विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यामुळे फ्रेशर्स पार्टीना पाठिंबा देणारी सारीच महाविद्यालयं या कन्सेप्टबाबत पुनर्विचार करण्यास प्रवृत्त झाली. कारण ब-याच महाविद्यालयांमध्ये कॉलेज कॅम्पसमध्ये शिक्षकांच्या उपस्थितीत फ्रेशर्स पार्टी होते. त्यानंतर या मोठमोठय़ा बडय़ा कॉलेजेस्मधले सीनिअर्स स्टुडन्ट एखाद्या क्लब किंवा पबमध्ये वेगळी ग्रॅँड फ्रेशर्स पार्टी आयोजित करतात. कॉलेज मॅनेजमेंट याला पाठिंबा देत नसली तरी त्यांचा विरोधही नसतो. समुद्रात राहायचं असेल तर मोठय़ा माशांशी वैर करून चालणार नाही, या न्यायाने बहुतेक ज्युनिअर्स अशा पाटर्य़ाना उपस्थित राहतात. पुढच्या पार्टीपर्यंत या वातावरणाची सवय होते आणि वर्षभरात या सा-या वातावरणाची चटकच लागते. मग नवीन येणा-या विद्यार्थ्यांच्या स्वागताच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या फ्रेशर्स पार्टीचा मूळ हेतू कुठेतरी मागेच हरवतो आणि समोर दिसतो तो व्यसनात आकंठ बुडालेला, आधुनिकतेच्या नावाखाली फॅशनच्या चिंध्यात लपेटलेला, शारीरिक व्याभिचाराने धुसर झालेला नवीन मार्ग.. आपल्या भविष्याची नवीन पहाट घडवण्यासाठी दाखल झालेले अनेक तरुण या मार्गावरून नकळत चालू लागतात आणि त्या भयाण मार्गासोबत भविष्याच्या सोनेरी पहाटेऐवजी ते काळोख्या अंधाराला आपलंसं करू लागतात.
कॉलेज लाइफमध्ये एन्जॉयमेंट, मजा-मस्ती हवीच. पार्टीजसुद्धा असाव्यात, पण कुठेतरी त्यांनासुद्धा एक नियमांची चौकट असावी.‘अति तेथे माती’ ही एक साधी म्हण म्हटलं सा-यांनाच माहीत आहे, पण आपल्या दैनंदिन जीवनात याचा अवलंब करायला मात्र आपण विसरतो. आज 63 वर्षानंतरसुद्धा 150 वर्ष ज्यांनी आमच्यावर राज्य करून होत्याचं नव्हतं करून टाकलं. त्यांच्या वेस्टर्न कल्चरशी सूर जुळावेत यासाठी आपण केवढा तो अट्टहास, केवढी धडपड करत असतो. सांस्कृतिक,पारंपरिक स्पर्धाना चाट देऊन मल्हार, उमंगसारख्या कोटय़वधी बजेटच्या फेस्टिव्हलमध्ये शेवटी होणारे ‘जॅम’स काय सांगतात? की आम्ही सगळेच इंग्रजाळलेलो आहोत. आपली संस्कृती आता तितकीशी आपलीशी वाटत नाही जितकी ही पार्टी, पब कल्चरची संस्कृती हॅपनिंग वाटते. शेवटी या सा-यांचं इप्सित काय? हे सगळं कुठे थांबणार? हे प्रश्नसुद्धा आजच्या युवा पिढीच्या भवितव्याप्रमाणे सिगारेटच्या धुरासारखे अधांतरीच राहतात

No comments:
Post a Comment