बँड्स, ग्रीटिंग, फुलं, व्हाइट टी-शर्ट्स, हातावर मित्र-मैत्रिणींची नावं आणि फ्रेंडशिपच्या हजारो एसएमएससोबत सीसीडीमध्ये टाइमपास.. शाळा-कॉलेज, ऑफिस, बस, ट्रेन, सोशल नेटवर्किंग साइट.. असं मोठं फ्रेंड सर्कल. प्रत्येक ग्रुपसोबत फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. इनशॉर्ट फुल टू धमाल. फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने पुन्हा आठवणींना उजळा मिळतो. ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार ‘फ्रेंडशिप डे’ म्हणून ओळखला जातो. त्यानिमित्ताने मैत्रीच्या वेगवेगळ्या धाग्यांचा घेतलेला वेध!
आजच्या स्पर्धेच्या युगात जय-वीरूची स्कूटवर बसून ‘ये दोस्ती हम नही छोडेंगे’ अशी गाणी गाणारी मैत्री अभावानेच आढळते. आता मैत्रीचं स्वरूप किंवा तिच्या व्याख्या बदलत गेल्या आहेत. कधी ही मैत्री नकळत होते, कधी ठरवून केली जाते तर कधी बळजबरीने लादली जाते. त्यातच सध्या इंटरनेटवर फ्रेंडलिस्ट वाढवण्यासाठी केली जाणारी मैत्री किंवा प्रोफेशनल मैत्री.. असे सगळे प्रकार बघून एक प्रश्न समोर येतो, तो म्हणजे आजच्या काळातील ही फ्रेंडशिप अॅक्च्युअल की व्हर्च्युअल?- नकळत होणारी मैत्री
- ठरवून केली जाणारी मैत्री
- जबरदस्तीची फ्रेंडशिप
- इंटरनेटवरील मैत्री..
सध्याच्या काळात मैत्रीत इंटरनेटचं महत्त्वाचं योगदान आहे. शाळेतले किती तरी जुने मित्र-मैत्रिणी, कुठे तरी गर्दीत हरवलेले अनेक चेहरे अवचित एखाद्या वळणावर ऑर्कुट आणि फेसबुकसारख्या माध्यमातून पुन्हा एकदा गवसतात. परंतु काही वेळा अमुक-तमुकच्या फेंड्सपेक्षा माझे फ्रेंड्स जास्त असावेत, या हव्यासापायी ओळखीचे बिनओळखीचे मित्रांच्या मित्राचे अथवा मैत्रिणीचे मित्र, मैत्रिणी सा-यांना आपल्या फेंड्रलिस्टमध्ये अॅड करण्याची सध्या क्रेझ निर्माण झाली आहे आणि याच क्रेझमुळे निर्माण झालेला मैत्रीचा एक प्रकार म्हणजे हाय-हॅलो फ्रेंडशिप.
अशा काही फ्रेंडशिपच्या प्रकारामुळे आजची फेंडशिप अॅक्च्युअल की व्हर्च्युअल आहे, असा प्रश्न पडतो. पण हा ज्याचा-त्याचा प्रश्न आहे. ‘एक लडका और लडकी कभी दोस्त नही बन सकते,’ वगैरे संकल्पना कधीच काळाच्या आड गेल्या आहेत. कॉलेजमध्ये भेटणारे मित्र वयाच्या साठीतसुद्धा आजही कोप-यातल्या इराण्याकडे भेटतात. पुलाखालून कितीही पाणी वाहून गेलं तरी ही मैत्री तितकीच तरुण असते. मात्र ही गोष्ट मैत्रीचा अर्थ समजून घेण्यावर आहे..
कारण आजही कुठे तरी
मैत्री ही एक आठवण आहेआयुष्याच्या शिदोरीतली
एक अमूल्य आठवण आहे.

No comments:
Post a Comment